नांदेड (प्रतिनिधी) – अहमदाबाद येथील विमान अपघाताच्या दु:खद घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने तीन दिवस दुखवटा पाळण्याच्या सुचना दिल्या आहेत. यामुळे काँग्रेसच्या वतीने आज शुक्रवारी रोजी सायंकाळी शहरात होणारी मशाल रॅली स्थगित करण्यात आली आहे. पुढील सुधारित तारीख १५ जून नंतर कळविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर व महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या गैरप्रकारा विरोधात शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खा. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात आज शुक्रवार रोजी सायंकाळी पाच वाजता मशाल रॅली काढण्यात येणार होती. मात्र गुजरात अहमदनगर येथे गुरुवार रोजी एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळून मोठा अपघात झाला. सदरची घटना अत्यंद दुःखद असल्याने प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुचनेवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने पुढील तीन विवस दुुःखवटा पाळण्यात येत आहे. यामुळे आज होणारी मशाल रॅली स्थगित करण्यात आली आहे. १५ जून नंतर मशाल रॅलीची सुधारित तारीख कळविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.