
शिवसेनेकडून आश्लेषा चौधरींना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर
(गजानन पाध्ये प्रतिनिधी)
:कळमनुरी नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर प्रत्येक पक्षातर्फे नगराध्यक्ष पदासाठी व नगरसेवक पदाकरिता अनेक उमेदवार सर्वच राजकीय पक्षाकडून उमेदवारी करिता प्रयत्नशील आहेत. त्यातच आज शिवसेना शिंदे गटातर्फे नगराध्यक्ष पदाकरिता आर आर पाटील यांच्या पत्नी आश्लेषा वैभव चौधरी पाटील यांची सर्वप्रथम उमेदवारी जिल्हाध्यक्ष तथा कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी जाहीर केली.
शिवसेना शिंदे गटाकडून अनेक उमेदवार नगराध्यक्ष पदा करिता इच्छुक होते. या
पदाकरिता मोठी चढाओढ देखील लागली होती. तसेच
आपल्या स्तरावरून प्रत्येक जण मोठ्या प्रमाणावर प्रयत्न देखील करत होते. मात्र पक्षाच्या निवडणूक समितीत तसेच वरिष्ठ स्तरावरून आश्लेषा चौधरी यांच्या नावास संमती देण्यात
आली.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आश्लेषा चौधरी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. आश्लेषा चौधरी यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मोठ्या ताकतीने निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असून कळमनुरी नगर परिषदेवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आशीर्वादाने तसेच आमदार तथा जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली भगवा फडकवणार अशी अशा व्यक्त केली. तसेच आर आर पाटील यांनी आमदार संतोष दादा बांगर यांच्या सोबत राहून कळमनुरी तील अनेक गोरगरीब रुग्णांची सेवा तसेच अनेकांच्या अडचणीमध्ये हक्काने धावून जाणारे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहणारे युवा नेतृत्व म्हणून त्यांनी काम केले कुठल्याही पदाची लालसा न करता त्यांनी आत्तापर्यंत काम केल्याची ही पावती त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली आहे