हिंगोली: कळमनुरी तालुक्यातील सांडस येथील कृष्णकांत शेवाळकर यांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली, ही निवड ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत भाऊ वडकुते यांनी केली आहे. कृष्णकांत शेवाळकर हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असून अनेक वर्षांपासून ते भाजपमध्ये कार्यरत आहेत, या आधी त्यांनी फ्रेंड्स ऑफ बीजेपी तालुका संयोजक, सेवाप्रष्ट, पदवीधर जिल्हा प्रमुख म्हणून पक्षाचे काम करत असताना घर चलो अभियान, गावचलो अभियान, सदस्य नोंदणी अभियान, बूथ सशक्तिकरण अभियान अशा अनेक अभियानातून पक्षाचे संघटन मोठ्या प्रमाणात वाढवलेले आहे.
त्यांच्या या कामाची पावती म्हणून त्यांची ओबीसी मोर्चा च्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली आहे, असे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत भाऊ वडकुते यांनी म्हटले आहे.