
प्रतिनिधी:- गजानन पाध्ये
36 वर्षानंतर भेटलेल्या बालमित्रानी भरविली दोन दिवसांची शाळा !!
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय कळमनुरी शाळेच्या 1989 यावर्षीच्या दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांचे नुकतेच दोन दिवसाचे स्नेहसंमेलन कळमनुरीत पार पडले. दोन दिवसाच्या या स्नेहसंमेलनातील पहिला दिवस सर्व मित्रांनी केंब्रिज स्कूल ऑफ स्कॉलर्स या शाळेत एकत्र येत साजरा केला. बऱ्याच वर्षानंतर जमलेल्या विद्यार्थ्यांनी बालपणीच्या विविध आठवणींना उजाळा दिला. बालपणीच्या विविध खेळांच्या आठवणी करत खो-खो, विटी दांडू, गोल रिंगन, तळ्यात मळ्यात, लिंगोरचा, टायर फिरवणे लंगडी, गाण्याच्या भेंड्या, नाचगाणी इत्यादी खेळ खेळत बालपणाचा आनंद घेतला. भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मित्रांनी मुक्काम करीत गप्पांची मैफिल भरवली.
त्यानंतर एक जून रोजी महात्मा ज्योतिबा फुले शाळेमध्ये गेट-टुगेदर चा दुसरा दिवस साजरा करण्यात आला. सकाळच्या अल्पोपहार नंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. १९८९च्या बॅच ला शिकविलेल्या सर्व उपस्थित शिक्षकांचे टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत करीत सर्व शिक्षकांना अभिवादन करण्यात आले. यानंतर मा सरस्वती, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिवीर हुतात्मा बहिर्जी, स्व.,नागोराव सावंत यांच्या प्रतिमांचे पुजन व दीपप्रज्वलन करून शाळा समिती अध्यक्ष शरद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. .
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर १९८९ बॅच चे मुख्याध्यापक स्व. टेकाळे सर, क्रीडा शिक्षक स्व.मेरकुटे सर, बॅचमधील स्वर्गवासी झालेले बारा विद्यार्थी तसेच सेवक केदारनाथ कासार व सदाशिव बोरकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
त्यानंतर अध्यक्षांचे तसेच सर्व गुरुजन वर्गाचे विद्यार्थ्यांच्या वतीने शाल, श्रीफळ, वृक्षभेट व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थी मित्रांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये नुकताच “शिक्षणमित्र राज्यपुरस्कार” मिळालेले व “मराठवाडा हेल्थ आइकॉन पुरस्कार” डॉ. संतोष व डॉ.शितल कल्याणकर या दांपत्याचा वैद्यकीय शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याकरिता तसेच नुकतेच “मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव” पदी विराजमान झालेले कर्तृत्ववान वर्गमित्र श्री मधुकर गुंजकर यांचा व “राज्य स्तरीय सावित्रीबाई फुले शिक्षक पुरस्कार” मिळाल्याबद्दल मुख्याध्यापिका छाया गायकवाड यांचा वर्गमित्र व मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
‘दोन दिवसाची शाळा शिकूया, पुन्हा एकदा लहान होऊया’ संकल्पनेतून या गेट-टुगेदर चे आयोजन करीत, या शाळेच्या उंबरठ्यावर कायमच भक्ती असणारे आम्ही सर्व विद्यार्थी यापुढे या बाल मैत्रीच्या जिव्हाळ्याचा बंध अधिकच घट्ट करणार असल्याची भावना व्यक्त करत कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर संतोष कल्याणकर यांनी केले.
त्यानंतर सर्व वर्ग मित्रांनी स्वतःच्या कर्तृत्वाविषयी कुटुंबाविषयी माहिती देत स्वपरिचय दिला.
बालपणीच्या विविध आठवणींना उजाळा देत अनेक बाल मित्रांनी मनोगत व्यक्त केले. यामध्ये दत्ता घन, डॉ. वसंत गाडे, सविता कावडे, भगीरथ बल्लुरकर, शीला मेने, अंजली देशपांडे, लता दळवी, प्रतिमा पांडे, प्रतिभा पाईकराव, मधुकर गुंजकर, छाया गायकवाड, डॉ. संतोष कल्याणकर, बिलाल कुरेशी, मुरलीधर राठोड, सुधाकर राठोड
यांनी आपल्या भावना व्यक्त करत बालपणीच्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले.
शिक्षक वृंदा मधून महंत खेडकर सर प्रा. आनंद पारडकर सर, सूर्यवंशी सर, एलजी शिंदे सर व आपल्या खुमासदार शैलीत प्रा. राजाराम बनसकर सर या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वावर अभिमान व्यक्त करत तुम्ही सारे आमच्या मार्गदर्शनाखाली घडलात याचा अभिमान वाटतो अशा भावना व्यक्त केल्या.
राठोड सर यांनी ‘तेरे जैसा यार कहा’ हे गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
अध्यक्षीय भाषणामध्ये शाळा समिती अध्यक्ष शरद सावंत यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या कर्तुत्व ऐकुन मी भारावून गेल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांना आशीर्वाद देण्याकरीता प्रा. आनंद पारडकर, प्रा. राजाराम बनसकर, एल. जी. शिंदे सर, निरगुडे सर, मा.मु. सूर्यवंशी सर, एम.डी. कदम सर, महंत खेडकर सर, सोनाळे सर, खोकले सर, शंकरराव राऊत सर उत्तमराव पतंगे सर, मु. तानाजी जगताप, माधव राठोड सर, केटी चव्हाण सर इत्यादी शिक्षकवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय सुंदर पद्धतीने डॉ. भगीरथ बल्लूरकर व छाया गायकवाड यांनी केले. आभार प्रदर्शन सचिन राका यांनी केले. फोटोसेशन नंतर सुंदर रसाळीचा आस्वाद सर्वांनी घेतला. परत एकदा भेटण्याची खुणगाठ बांधत कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. संतोष कल्याणकर, मधुकर गुंजकर, रवींद्र कस्तुरे, दुर्गाजी साखरे, रवींद्र बोरकर, ॲड.देवेंद्र पांडे, भागवत निरगुडे, भगीरथ बलूरकर, कृष्णा देवळे, डॉ.गुलाब नरवाडे, सुरेश खिल्लारे, अनिल भोसकर, बाबुराव बोरकर, नितीन कल्याणकर, शीला मेने, छाया खंदारे, मीना पतंगे, प्रतिभा देशपांडे, अंजली देशपांडे, बिलाल कुरेशी, शेख रफिक शेख हुसेन, नितीन कल्याणकर, शिवाजी अंभोरे, मुरलीधर राठोड, सुधाकर राठोड, गजानन चिंचने, विठ्ठल दिंडे व सर्व वर्गमित्रमैत्रिणींनी विशेष प्रयत्न केले.