
नांदेड:-हिंद -दी-चादर श्री गुरु तेग बहादर साहिब यांच्या वतीने मानवता व धर्म रक्षणासाठी दिलेल्या शहादत (बलिदानास) गुरुद्वारा सचखंड बोर्डातर्फे आदरणिय पंजप्यारे साहिबान यांच्या सरप्रस्तीमध्ये गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ जी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहेत. हे कार्यक्रम 23 नोव्हेम्बर ते 25 नोव्हेम्बर पर्यंत तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिब च्या दरबार साहिब परिसर, श्री गुरु ग्रंथ साहिब जी भवन, श्री दशमेश हॉस्पीटल येथे आयोजित होणार आहेत.
या कार्यक्रमांमध्ये दि. 23 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर पर्यंत पर्यंत तख्त साहिब मध्ये विशेष किर्तन दरबार चे आयोजन करण्यात आले आहेत ज्यामध्ये पंथ प्रसिध्द रागी जत्थे (किर्तनकार), कथाकार इत्यादींचे धार्मिक किर्तन व प्रवचन होणार तसेच जनजागृती व युवा पिढीच्या प्रेरणास्तव श्री गुरु तेग बहादर सांहिब जी यांनी दिलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांची सद्भावना रैली चे आयोजन करण्यात आलेले आहे. ही रैली खालसा हायस्कूलच्या प्रांगणा पासून गुरुद्वारा सचखंड साहिब येथे समापन होईल.

श्री गुरु ग्रंथ साहिब जी भवन मध्ये श्री गुरु तेग बहादर साहिब जी यांच्या जीवनावर आधारीत सेमिनार, संगोष्ठी व विविध धर्मिय विद्वान, प्रमुखांसह त्यांचे प्रवचन इत्यादी चा कार्यक्रम ‘सर्व धर्म सम्मेलन’ आयोजित करण्यात येणार आहे. तसेच वैद्यकिय सुविधा नागरिकांना उपलब्ध व्हावी त्यासाठी श्री दशमेश हॉस्पीटल, महाराजा रणजीत सिंघ जी यात्री निवास येथे रक्तदान शिबीर, मेडीकल चेकअप, दंत चिकित्सा, डोळ्यांचे उपचार, हृदय विकार तज्ञांचे कॅम्प व विशेष करुन निःशुल्क रक्त तपासणी आणि मोफत डायलेसीस कॅम्प चे आयोजन करण्यात आलेले आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुद्वारा बोर्डाचे मा. प्रशासक साहिब यांनी या कार्यक्रमाची सर्व तयारी योग्य रीतीने करावी त्यासाठी सर्व अधिकारी, विभाग प्रमुख, कर्मचाऱ्यांना निर्देश जारी करुन या कार्यक्रमासाठी योग्य ती व्यवस्था करणे बाबत सूचीत केले आहे. तरी सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की श्री गुरु तेग बहादर साहिब जी यांच्या 350 व्या शहादत समागम व गुरतागद्दी ला समर्पित या सर्व धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा.