
नांदेड : काँग्रेस पक्षाच्या नांदेड शहर संघटन सचिवपदी धनंजय उमरीकर यांची नियुक्ती करण्यात आली असून, याबाबतचे पत्रक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.
धनंजय उमरीकर हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान व सक्रिय कार्यकर्ते असून, गेल्या अनेक वर्षांपासून ते पक्षकार्यात सातत्याने योगदान देत आहेत. विविध आंदोलनं, सामाजिक उपक्रम, पक्षाच्या मोर्चांमध्ये त्यांनी नेहमीच उत्साहाने सहभाग घेतला आहे.
सध्या ते काँग्रेसच्या नांदेड शहर सोशल मीडिया प्रमुख म्हणून कार्यरत असून, त्यांनी ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करून आता त्यांच्यावर संघटन सचिव ही अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
धनंजय उमरीकर यांच्याकडे आता सोशल मीडिया प्रमुख आणि संघटन सचिव अशी दुहेरी जबाबदारी येणार असून, ते दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडतील, असा विश्वास पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.

त्यांच्या या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत असून, शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून उमरीकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
धनंजय उमरीकर यांनी आपल्या निवडीबद्दल समाधान व्यक्त करत, म्हटले आहे की —
“महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी माझी नांदेड शहर संघटन सचिव म्हणून निवड केल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. तसेच नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा. रविंद्र चव्हाण साहेब, नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष मा. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर साहेब, नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष मा. राजेश पावडे साहेब आणि महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार साहेब यांचेही आभार.” 🙏🏼