
भाजपा च्या जास्तीत जास्त जागा निवडून आणू तालुका अध्यक्ष ओंकार नावडे यांचा संकल्प
गजानन पाध्ये प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी भाजपाच्या कळमनुरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त संख्येने निवडून आणू असा संकल्प तालुका अध्यक्ष ओंकार नावडे यांनी केला आहे मतदार बंधू आणि भगिनींनो येणाऱ्या काळामध्ये शहराचा विकास व रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सर्व ताकतीने भाजपाच्या पाठीमागे उभे राहावे असे आव्हान देखील नावडे यांनी केले आहे या निवडणुकीमध्ये धनशक्ती विरोधात जनशक्तीचा सामना आहे तर माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनो आपण विकासाच्या दृष्टीने जनशक्तीच्या पाठीमागे उभे राहावे कुठल्याही आमिषाला बळीनपडता आपण भारतीय जनता पार्टी म्हणजेच भाजपाला मतदान करावे भाजप या निवडणुकीमध्ये साम दाम दंड भेद या सर्व गोष्टीचा उपयोग करून जशास तसे उत्तर देऊन जास्तीत जास्त जागा निवडून आणणार आहे केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना कळमनुरी सुद्धा सत्ता मिळवायची आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत 100% कमळ फुलणार आहे असे मत नावडे यांनी व्यक्त केले