पोलिसात तक्रार दाखल : गाडीची काच फोडून अज्ञात इसमाकडून नुकसान

नांदेड, 27 जून 2025 – शहरातील जुना मोढा परिसरात उभी असलेली क्रेटा कारचे अज्ञात इसमाने काच फोडून 5 ते 7 हजार रुपयांचे नुकसान केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गाडीच्या मालकाने इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार खैरा हंसराजसिंघ रसालसिंघ (वय 30 वर्षे) हे खासगी नोकरी करत असून, ते गुरुद्वारा गेट नं. 05, बडपूरा, नांदेड येथे राहतात. त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, दिनांक 25 जून 2025 रोजी रात्री 10:00 वाजता त्यांनी आपले वाहन MH 26 BX 2221 (क्रेटा कार) हे जुना मोढा येथील महाराजा रणजीतसिंघ मार्केटच्या पार्किंगमध्ये उभे केले होते.
मात्र 27 जून 2025 रोजी संध्याकाळी 8:00 वाजता, त्यांचा लहान भाऊ तरणजीतसिंघ रसालसिंघ खैरा याने पाहिले असता गाडीच्या काचा फोडलेल्या अवस्थेत आढळल्या. तसेच, गाडीतील वस्तूंना हात लावून 5 ते 7 हजार रुपयांचे नुकसान केल्याचेही निदर्शनास आले.
या घटनेबाबत तक्रारदाराने पोलिसांकडे लेखी तक्रार देऊन अज्ञात व्यक्तीविरुद्ध चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी आपल्या जबाबात दिलेली आहे.
इतवारा पोलीस स्टेशनने घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.