
नांदेड | नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषद व पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य अकादमी पुरस्कार विजेते डॉ. सुरेश सावंत आणि राज्य शासनाचा वृत्त छायाचित्रकार पुरस्कार प्राप्त सचिन मोहिते यांचा शासकीय विश्रामगृह येथे जाहीर सत्कार सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमास जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. डी. पी. सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी डॉ. सावंत आणि सचिन मोहिते यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास अधिस्वीकृती समितीचे विभागीय अध्यक्ष विजय जोशी, मराठवाडा उपाध्यक्ष प्रकाशभाऊ कांबळे, जिल्हाध्यक्ष संतोषजी पांडागळे, माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर, माजी जिल्हा संघटक पंडित वाघमारे, तसेच नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा संघटक दिलीप वाघमारे नरसीकर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रम अत्यंत उत्साहात व सन्मानपूर्वक पार पडला.