
प्रतिनिधी(गजानन पाध्ये): कळमनुरीआज दिनांक 16 जून रोजी शैक्षणिक सत्र 2025 – 26 ला सुरुवात झाली. उन्हाळी सुट्ट्यांच सत्र संपल्यानंतर विद्यार्थी व पालक यांना शाळेचे वेध लागले होते. संस्थाध्यक्ष डॉ.संतोष कल्याणकर तसेच शाळेच्या सचिव डॉ. शितल कल्याणकर यांच्या हस्ते सरस्वतीमाता तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने स्वागत समारंभाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. या शैक्षणिक वर्षात 50000 रोपट्यांचे वृक्षरोपणासाठी वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून या उपक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवापासून करण्यात आली असल्याचे संस्थाध्यक्ष डॉ. संतोष कल्याणकर यांनी सांगितले. त्यासोबतच उपस्थित पालक, विद्यार्थी, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांना वृक्षरोपणासाठी डॉ.संतोष व डॉ.शितल कल्याणकर यांच्या हस्ते रोपट्यांचे वाटप करण्यात आले. शाळेचे प्रवेशद्वार फुग्यांनी सजविण्यात आले होते तर प्रत्येक वर्ग सुशोभित करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यात आला. सेल्फी पॉइंट ला फोटो काढण्याचा सर्वांनी आनंद घेतला. या प्रसंगी मुख्याध्यापक प्रदीप पतंगे, जयरश्मी के, मनीषा पतंगे, शीतल आळणे, बेबीताई मोरे, गजानन कोदंडे, रईसा मॅडम, शंकर जाधव, तबस्सुम, स्वीटी साकले, खंदारे, टाकळकर, मगर, आघाव, देशमुखे, पाठक, चंद्रकांत डुकरे इ. शिक्षक वर्ग उपस्थित होता. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी उपस्थिती लक्षणिय होती.