
नांदेड प्रतिनिधी(जगदीप सिंघ): ३० जून २०२५:
गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचलगुरू साहिब, नांदेड यांच्या मालकी हक्कासाठी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. गुरुद्वारा बचाव संघर्ष समितीने नांदेडच्या ऐतिहासिक गुरुद्वाऱ्याचा प्रशासन परत सखोल लोकशाही पद्धतीने चालवावा, या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
१९५६ मध्ये तत्कालीन सरकारने महाराष्ट्र गुरुद्वारा अधिनियम लागू करून लोकशाही पद्धतीने गुरुद्वारा बोर्ड स्थापन केला होता. मात्र २०१५ पासून शासनाने या अधिनियमाची अंमलबजावणी बंद केली असून, त्यामुळे गुरुद्वाऱ्याचे लोकशाही व्यवस्थापन खंडित झाले आहे. या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर कलम 11 मध्ये केलेल्या संशोधन रद्द करून गुरुद्वाऱ्याचा कारभार पूर्ववत करावा, अशी समितीची मागणी आहे.गुरुद्वारा बचाव संघर्ष समितीच्या वतीने ३० जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच 3 जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. समितीने सरकारला वेळेत निर्णय न घेतल्यास 11/7/2025 रोजी मुंबई आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करणार येणार आहे.अशा इशारा समितीचे वतीने दिला आहे. निवेदन
निवेदन देते वेळेस जरनैल सिंघ गाडीवाले, मनबीर सिघ ग्रंथी, महेंद्रसिंघ पैदल,जसबीर सिंघ बुगई, मनिंदर सिंघ रामगडिया, बीरेंद्र सिंघ बेदी. जगदीप सिंघ नंबरदार, आदी उपस्थित होते.