पाच तख्त साहिबान ला होणारी विशेष रेल्वे लवकरच सुरु होईल – डॉ. विजय सतबीर सिंघ

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

प्रतिनिधी नांदेड-२२ मे – गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ माजी आई.ए.एस. यांचे सल्लागार स. जसवंत सिंघ जी बॉबी यांनी आज राज्य रेल्वे मंत्री स. रवनीत सिंघ जी बिट्टू यांची विशेष भेट घेतली. ही बैठक दिल्लीतील रेल भवन येथे अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणात झाली, ज्यामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. श्री बॉबी म्हणाले की लवकरच डॉ. विजय सतबीर सिंघ जी प्रशासक हे महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, यू.पी यांच्या नेतृतत्वाखाली, उत्तरप्रदेश, कर्नाटक, पंजाब इत्यादी रज्यातील मुख्य मान्यवरांचे एक विशेष शिष्टमंडळ दिल्ली येथे भारताचे रेल्वे राज्य मंत्री श्री रवनीत सिंघ जी बिट्टू यांची भेट घेईल. येथे हे नमूद करणे आवश्यक आहे कि श्री हजूर साहिब नांदेड ते संपूर्ण भारतभर थेट आणि सोपा प्रवास करण्याची मागणी भाविकांकडून बऱ्याच काळापासून केली जात आहे. ज्याचा फायदा श्री हजूर साहिब नांदेड आणि इतर शहरातील भाविकांना होउ शकेल. अशा विशेष रेल्वेच्या संचलना मुळे उत्तर, मध्य आणि दक्षिण भारतातील अर्ध्याहून जास्त राज्यांमध्ये राहणाऱ्या शिख भाविकांना मोठा लाभ होईल. त्याच प्रमाणे श्री हजूर साहिब नांदेड येथून श्री हेमकुंड साहिबला मोठ्या संख्येने भाविक प्रवास करतात. या मार्गावर श्री हजूर साहिब नांदेड ते देहरादून त्याच बचोबर श्री हजूर साहिब नांदेड ते पांच तख्तांसाठी एक विशेष तीर्थयात्रा रेल्वे चालविण्यासाठी रेल्वे मंत्र्यांना विनंती पत्र सादर केले जाईल. राज्य रेल्वे मंत्री श्री रवनीत सिंघ जी बिट्टू म्हणाले की, भारताचे माननिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी, गृहमंत्री श्री अमित शाह जी आणि त्यांची संपूर्ण टीम श्री गुरु गोबिंद सिंघ जी महाराजांच्या पवित्र चरण स्पर्श केलेल्या श्री हजूर साहिब नांदेडच्या भाविकांची सेवा करण्यासाठी नेहमीच तत्पर आहेत.

GPS News 24
Author: GPS News 24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें