प्रतिनिधी:- वसमत आगार प्रमुखाचा कारभार मनमानी सुरू आहे. नियोजन शून्य तसेच सर्व ठिकाणी घाणिचे साम्राज्य अस्वच्छ वातावरण अस्ताव्यस्त लागणाऱ्या बसेस आणि मोडकळीस आलेल्या गाड्यामागील अनेक दिवसांपासून प्रवासी वसमत आगारातून बस मध्ये प्रवास करत असतात वसमत आगाराला नवीन बसेस मिळाल्या नाही आणि यासाठी विद्यमान अगर प्रमुख कोणताही प्रयत्न करताना दिसत नाही.मागच्या अनेक दिवस झालं, अपडाऊन करणारे सहप्रवासी वसमत आगाराच्या व आगारप्रमुखाच्या भोंगळ कारभाराला त्रासलेल्या आहेत.वसमत आगारांमध्ये एकही बस शेवटपर्यंत घेऊन जाईल अशी दिसत नाही…. आणि आगारप्रमुख आपल्या प्रमोशनसाठी आणि आगाराचे ठेवलेलं बक्षीस जिंकण्यासाठी जुन्या गाड्या आगारात बोलून प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना वेटीस धरण्याच काम करत आहे तर अशा आगार प्रमुखाकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन कार्यवाही व्हावी अशी मागणी प्रवासी करत आहे.