पहेलगाम येथील भ्याड आतंकवादी हल्ल्याचा आमदार संतोष बांगर यांच्या वतीने कळमनुरी येथे जाहीर निषेध

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कळमनुरी प्रतिनिधी:-

जम्मू कश्मीर येथील पेहलगाम मध्ये पर्यटकांची धर्मविचारून हत्या करणाऱ्या आतंकवाद्यांचा जाहीर निषेध करण्यात आला,यावेळी आमदार संतोष बांगर हे म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी व गृहमंत्री अमितजी शहा हे आशा आतंकवाद्यांसाठी कर्दनकाळ असलेले नेते आहेत. ते त्यांना कदापी सोडणार नाहीत हे आम्हाला माहिती आहे, पण तरीसुद्धा एक कळमनुरी विधानसभेचा आमदार म्हणून या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे.आम्हाला एका तासासाठी पाकिस्तान मध्ये जाण्याची सूट द्या आम्ही पाकिस्तानचे नाव या जगाचा नकाशाहून हटवण्याची ताकद ही आमच्या हिंदुस्तानातील जनतेमध्ये आहे हिंदुस्थानातील लोकांनी ठरवल्याच्या नंतर दहा मिनिटे सुद्धा लागणार नाहीत अशा आतंकवादी वृत्तीच्या पाकिस्तानला निस्तानाभूत करण्यासाठी अशा शब्दात तीव्र निषेध करत पाकिस्तान आणि आतंकवाद्यांचा जाहीर निषेध केला.”देश के गद्दार को गोली मारो सालो को”अशा घोषणाबाजी करत, पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद घोषणा देत, काही वेळाचा रास्ता रोको करत आमदार संतोष बांगर व कळमनुरी विधानसभेतील देशभक्तांनी या घटनेचा जाहीर निषेध केला. यावेळी विधानसभेचे आमदार संतोष बांगर, युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम, जिल्हा सह संपर्कप्रमुख राजेंद्र शिखरे, तालुकाप्रमुख धनंजय पाटील सूर्यवंशी, जयदीप काकडे, शहर प्रमुख बबलू पत्की, अॅड विश्वनाथ चौधरी, आर आर पाटील, मयूर शिंदे, हरीश भोसले, विनोद बांगर, शिवा भुसारे, रवी शिंदे, शिवम नाईक, पप्पू पठाण, बबलू पंचलिंगे, बंटी चवाद, ऋषी सोनटक्के, पवन उन्हाळे, रेखाताई देवकते, महिला तालुकाप्रमुख सावित्राबाई गाभणे, संगीता गठ्ठे, सुनिता गठ्ठे, यांच्यासह अनेक शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

GPS News 24
Author: GPS News 24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें