
प्रतिनिधी:- गजानन पाध्ये
कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी अनेक वेळा गोरगरीब जनतेच्या हक्कासाठी व गरजू रुग्णांसाठी शिवसैनिक स्टाईलने डॉक्टर, आरटीओ, व मुजोर अधिकारी यांना झापलेले पाहायला मिळते मात्र काही दिवसांपूर्वी एमजीएम हॉस्पिटल संभाजीनगर येथील एका डॉक्टरांना आपल्या विधानसभेतील चिमुकली आदिती सरकटे ला डेंगू आजार झाल्याने एमजीएम हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले होते त्यांच्या नातेवाईकांनी स्वतःची परिस्थिती हलाखीची असल्याने आपले बिल सहा लाख 23 हजार रुपये झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पाच लाख 21 हजार रुपये दिलेत, मात्र पेशंटला सुट्टी देत नसल्याने आमदार संतोष बांगर यांना फोन द्वारे संपर्क केला असता आमदार संतोष बांगर यांनी संबंधित एमजीएम हॉस्पिटल येथील डॉक्टरांना फोन द्वारे विचारणा केली की डेंगू आजाराचे एवढे बिल कसे?तर त्यांनी उडवा उडवी चे उत्तरे देत बोलत होते म्हणून तर आमदार संतोष बांगर यांनी आपण काय अमृत पाजले का? व आपण खाटकांपेक्षाही निर्दयी खाटीक आहात अशा भाषेत एमजीएम हॉस्पिटलच्या डॉक्टरांना बोलल्याने संचालकाच्या चांगल्याच जीवारी लागले व हे प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला आहे. कारण संबंधित संचालकाच्या जवळील एका वृत्तपत्रामध्ये आमदार संतोष बांगर यांच्या विषयी अतिशय खालच्या दर्जाचे लिखाण करून त्यांच्याबद्दल जे विशेष भाग प्रकाशित केल्या जात आहेत हे एखाद्या लोकप्रतिनिधींच्या बद्दल चुकीचे आहे. कारण ते सर्वसामान्य जनतेतून दोन वेळा निवडणूक लढवून विधानसभेत गेलेले आहेत व ते सध्याला आमदार म्हणून काम करत आहेत त्यामुळे एखाद्या वृत्तपत्राने कोणाबद्दल आपण काय प्रकाशित करत आहोत हे बघितले पाहिजे कारण अशा वृत्तपत्रांमुळे बाकीच्या दर्जेदार वृत्तपत्रांच्या बाबतीत घसरण होत आहे व पत्रकारांना नाव बोट ठेवल्या जात आहे एमजीएम हॉस्पिटलच्या संचालकाच्या चांगल्या जीवारी लागलेला प्रश्न म्हणजे आपण काय अमृत पाजले का आणि खाटीका पेक्षाही मोठे खाटीक आहात तुम्ही हॉस्पिटलच्या नावाखाली कत्तलखानाच चालवत आहात अशा भाषेत बोलल्याने आमदारांबद्दल प्रतिक्रिया देणाऱ्या डॉक्टरांनी त्याजागी स्वतःच्या घरचा पेशंट असता तर हा प्रश्न आहे? आणि एवढे बिल डेंगूचे होईल का हे आपण स्वतःच आपल्या मनाला विचारून पाहायला पाहिजे व महाराष्ट्रामध्ये एवढे आमदार आहेत मात्र तत्परतेने गोरगरीब जनतेसाठी व रुग्णांसाठी धावून जाणारे सर्वसामान्य आमदार म्हणजे देवदूत संतोष बांगर आहेत.आपल्या शिवसैनिक स्टाईल ने आणि आक्रमक स्वभावाने ते नेहमीच चर्चेत राहतात त्यांच्यावर शिवसेनाप्रमुख हिंदू हदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि एकनाथ भाई शिंदे यांचे पाठीशी असलेले बळ हेच त्यांना गोरगरीब जनतेच्या हक्कासाठी लढण्याचे बळ देत असतात त्यामुळे शिवसैनिक आमदार कसा असावा तर हे आमदार बांगर यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येते आणि पैसा तर काय सर्वच नेतेमंडळी कमावत असतात मात्र दानधर्म करण्याची वृत्ती व ते काळीज लागते महाराष्ट्रामध्ये अनेक नेत्यांकडे गडगंज संपत्ती आहेत. महाराष्ट्राच्या सात पिढ्या बसून खातील इतके नेते मोठे आहेत मात्र अल्पकाळात उदयास आलेले संतोष बांगर हे आपल्या धार्मिक आणि दानशूरतेने नेहमीच महाराष्ट्रातल्या जनतेला पहावयास मिळतात इतर ठिकाणी आमदार असा असावा म्हणून सर्वसामान्य नागरिक बोलत असतात ,गोरगरिबांच्या प्रश्नासाठी रात्रंदिवस तत्परतेने राहणारा आमदार म्हणजे संतोष दादा बांगर एरवी कळमनुरी विधानसभेला आमदार म्हटले की अमावश्या पौर्णिमेला पाहावयास मिळणारे आमदार होते मात्र बांगर यांच्या रूपाने एका फोनवर संपर्क करता येणारे आमदार कळमनुरी विधानसभेला लाभले आहे.एक कॉल मॅटर सॉल या म्हणी प्रमाणे ते कार्य करत असतात व सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असतात ना कुठला पीए ना कुठला भेटीचा वेळ ऑन ड्युटी 24 तास कार्यरत असलेले आमदार यांना फोन द्वारे संपर्क केला की ते हजर होतात व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडतात त्यामुळे आमदार संतोष बांगर यांना कळमनुरी विधानसभेने दुसऱ्यांदा निवडून दिले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जनता त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे सर्वसामान्य नागरिकात बोलले जात आहे व त्यांना मंत्री पद मिळावे ही जनमानसाची इच्छा आहे,आमदार असावा तर असा या म्हणीप्रमाणे शिवसैनिक स्टाईल मध्ये आपले कार्य करणारे आमदार संतोष बांगर यांना अशा खाटिक हॉस्पिटलच्या संचालकांनी कितीही सुद्धा टार्गेट केले तरी आमदार बांगर यांनी आपले काम असेच सुरू ठेवावे व गोरगरीब सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावावे व मुजोर डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी, यांनी गोरगरीब सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावावेत नाहीतर येणारा काळामध्ये शिवसैनिक स्टाईलने रस्त्यावर उतरावे लागेल असे कळमनुरी शिवसेना शहर प्रमुख योगेश (बबलू )पत्की यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले