
नांदेड /अमृतसर- ३० ऑक्टोबर :
महाराष्ट्रातील भाविकांना अध्यात्म, पर्यटन, इतिहास आणि संस्कृतीचा अद्वितीय अनुभव देणारी नानक साई फाऊंडेशन ची नांदेड (हजुर साहिब) ते अमृतसर व्हाया नरसी नामदेव हि ११ वी “घुमान यात्रा” गुरुवारी ३० ऑक्टोबर रोजी अमृतसर येथे पोहचली. उद्या १ नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र घुमान ला जाणार आहे. तेथे भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
समाजासमाजाला जोडण्याचे काम अस संत मंडळी करतात. संत नामदेव महाराज यांनी मराठीची पताका थेट पंजाबपर्यंत नेली आणि पंजाब व महाराष्ट्रात बंधू भाव निर्माण केला. त्यांच्या या कार्याची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी नानकसाई फौंडेशन दरवर्षी “ना नफा ना तोटा” या पध्दतीने घुमानयात्रा आयोजित करते ही बाब ऐतिहासिक आहे. नांदेड च्या लंगर साहिब गुरुद्वारा चे प्रमुख संत बाबा नरेंद्रसिंघ जी व संत बाबा बलविंदरसिंघ जी यांचा कृपा आशीर्वाद घेऊन यात्रा पंजाबला आली आहे.
यात्रा नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष नांदेड येथील तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहा ने पंजाब मध्ये भ्रमण करीत आहे. यात्रा अमृतसर येथे पोहचली असून आज सुवर्ण मंदिरात नतमस्तक होऊन उद्या १ नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र घुमानला जाणार आहे. तेथे भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
संत नामदेव महाराजांच्या पवित्र कर्मभूमी घुमान (पंजाब) येथे नतमस्तक होणार असून सुवर्ण मंदिर, अमृतसर येथे दर्शन व वाघा बॉर्डर,दिल्ली, चंदिगड, भटिंडा, आनंदपूर साहिब, फतेहगड साहिब, जालियनवाला बाग या महत्त्वाच्या स्थळांना भेट देणार आहे. रामतीर्थ (लव–कुश जन्मस्थळ), वाल्मिकी आश्रम, भद्रकाली माता मंदिर, कार्तिक स्वामी मंदिर, नैना देवी शक्तीपीठ, भाक्रा नांगल धरण, पानिपत, कुरुक्षेत्र आदी ठिकाणाना भेट देऊन यात्रा ६ नोव्हेंबर रोजी नांदेड ला परत जाणार आहे अशी माहिती घुमान यात्रे चे मुख्य संयोजक पंढरीनाथ बोकारे यांनी दिली.