‘हनुमान अंश’ चित्रपटाचे संगीतकार धीरेंद्र मुलकलवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. दुष्काळी परिस्थिती मध्ये कुणीही शेतकरी मदती पासून वंचित राहणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई येथे ‘माथाडी मित्र’ या पाक्षिकाचे पुनर्प्रकाशन केले. माथाडी कामगारांच्या न्याय्य हक्कांना वाचा फोडणारे आणि कामगार चळवळीत जागृतता आणणारे हे पाक्षिक आहे. पावसाचा खंड पडल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जऊळका, ता. मालेगाव, जि. वाशिम येथे नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या विश्वासाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे विश्वामित्र ‘भाषिणी’ ॲपचा डेमो पाहिला. यावेळी इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, जपानी व मराठी या भाषांमधील ऑडिओचे लेखी स्वरूपात रूपांतर तसेच एका भाषेतील ऑडिओचे विविध भाषांमध्ये भाषांतर करण्याची ‘भाषिणी’ची कार्यप्रणाली जाणून घेतली. रोजगारासाठी परदेशात जाणाऱ्या तरुणांचा ‘भाषिणी’मुळे संवादातील अडथळा दूर होणार आहे. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार राजेश क्षीरसागर व इतर मान्यवर उपस्थित होते. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळाचा विकास आणि पर्यटन वाढीवर भर

अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचा विकास : पर्यटन आणि वारसा संवर्धनाला चालना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळ, चौंडी (अहिल्यानगर) येथील जतन व संवर्धन विकास आराखड्यासंदर्भात बैठक संपन्न झाली.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श कायम स्मरणात राहणारा आहे. त्यांच्या जीवनकार्यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने चौंडी गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने अनेक विकासकामे हाती घेण्यात आलेली आहेत. चौंडीचा विकास सर्वसमावेशक व नियोजनबद्ध पद्धतीने करत दर्जेदार सुविधांच्या माध्यमातून पर्यटनास चालना देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

चौंडी येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी ₹681 कोटींची तरतूद करण्यात आली असून, या प्रकल्पांतर्गत स्मारक परिसरात भव्य पुतळा, सुशोभित उद्यान, नदीकाठाचा विकास, आधुनिक संग्रहालय, ओपन एअर थिएटर आणि पर्यटन सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे. स्मारक परिसरात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता करण्यासाठी जलव्यवस्थापनाच्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात यावा. तसेच हरित क्षेत्र आणि मोकळ्या जागांचा समतोल राखत परिसराचे सौंदर्यीकरण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

‘बॅरेज’ उभारण्याबाबत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी. मंदिर परिसरातील भूसंपादन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करावे. प्रकल्पातील काही सुविधा उभारणी व देखभालीसाठी खासगी भागीदारी (पीपीपी मॉडेल) आणण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असून, यामुळे पर्यटन सुविधा अधिक दर्जेदार, कार्यक्षम व दीर्घकालीन टिकाऊ पद्धतीने विकसित करता येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमुद केले.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ₹360 कोटींच्या रस्ते प्रकल्पातील दोन कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रकल्पासाठी आवश्यक जागेच्या सीमारेषा निश्चित करण्यासाठी वन, सार्वजनिक बांधकाम, जलसिंचन विभाग आणि ग्रामपंचायत यांनी संयुक्त मोजणी केली असून सीमारेषा निश्चित करण्यात आल्या आहेत. चौंडी येथील स्मारकाचा विकास नियोजनबद्ध पद्धतीने आणि टप्प्याटप्प्याने केला जात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमुद केले.

यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई येथे ‘माथाडी मित्र’ या पाक्षिकाचे पुनर्प्रकाशन केले. माथाडी कामगारांच्या न्याय्य हक्कांना वाचा फोडणारे आणि कामगार चळवळीत जागृतता आणणारे हे पाक्षिक आहे.

पावसाचा खंड पडल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जऊळका, ता. मालेगाव, जि. वाशिम येथे नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या विश्वासाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे विश्वामित्र ‘भाषिणी’ ॲपचा डेमो पाहिला. यावेळी इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, जपानी व मराठी या भाषांमधील ऑडिओचे लेखी स्वरूपात रूपांतर तसेच एका भाषेतील ऑडिओचे विविध भाषांमध्ये भाषांतर करण्याची ‘भाषिणी’ची कार्यप्रणाली जाणून घेतली. रोजगारासाठी परदेशात जाणाऱ्या तरुणांचा ‘भाषिणी’मुळे संवादातील अडथळा दूर होणार आहे. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार राजेश क्षीरसागर व इतर मान्यवर उपस्थित होते.