‘हनुमान अंश’ चित्रपटाचे संगीतकार धीरेंद्र मुलकलवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई येथे ‘माथाडी मित्र’ या पाक्षिकाचे पुनर्प्रकाशन केले. माथाडी कामगारांच्या न्याय्य हक्कांना वाचा फोडणारे आणि कामगार चळवळीत जागृतता आणणारे हे पाक्षिक आहे.
पावसाचा खंड पडल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जऊळका, ता. मालेगाव, जि. वाशिम येथे नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या विश्वासाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे विश्वामित्र ‘भाषिणी’ ॲपचा डेमो पाहिला. यावेळी इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, जपानी व मराठी या भाषांमधील ऑडिओचे लेखी स्वरूपात रूपांतर तसेच एका भाषेतील ऑडिओचे विविध भाषांमध्ये भाषांतर करण्याची ‘भाषिणी’ची कार्यप्रणाली जाणून घेतली. रोजगारासाठी परदेशात जाणाऱ्या तरुणांचा ‘भाषिणी’मुळे संवादातील अडथळा दूर होणार आहे. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार राजेश क्षीरसागर व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे महसूल विभागाच्या ‘महाखनिज 2.0’ प्रणाली व मोबाईल ॲपचे लोकार्पण आणि राज्य महाखनिज नियंत्रण कक्षाचे उदघाटन केले.
विलंबित डीबीएस रेफरल्स पार्किन्सनच्या उपचारांच्या परिणामांवर मर्यादा घालतात: AIIMS तज्ञ| भारत बातम्या