पावसाचा खंड पडल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जऊळका, ता. मालेगाव, जि. वाशिम येथे नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या विश्वासाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले.