मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे विश्वामित्र ‘भाषिणी’ ॲपचा डेमो पाहिला. यावेळी इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, जपानी व मराठी या भाषांमधील ऑडिओचे लेखी स्वरूपात रूपांतर तसेच एका भाषेतील ऑडिओचे विविध भाषांमध्ये भाषांतर करण्याची ‘भाषिणी’ची कार्यप्रणाली जाणून घेतली. रोजगारासाठी परदेशात जाणाऱ्या तरुणांचा ‘भाषिणी’मुळे संवादातील अडथळा दूर होणार आहे. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार राजेश क्षीरसागर व इतर मान्यवर उपस्थित होते. September 21, 2026 No Comments Read More »